मंगळवारी (६ ऑगस्ट) मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह चर्चा केल्यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी सरकारला चार दिवसांचा वेळ दिल्याचं जरांगे म्हणाले. तसंच शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं आहे, असं आवाहनही त्यांनी आंदोलकांना केलं. यावेळी गिरीश महाजनांसह अर्जुन खोतकर, संदीपान भूमरे देखील उपस्थित होते.