मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (१० सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक पार पडली. मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असा ठराव एकमताने बैठकीत मंजूर करण्यात आला. तसंच आरक्षणासाठी गठित केलेल्या समितीला वेळ द्यावा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रात्री उशिरा या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली होती.