मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे चर्चेत आहे. आता जरांगे पाटील यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या संघर्षावर लवकरच एक मराठी चित्रपट येणार असल्याची माहिती चित्रपट निर्माते शिवाजी दोलताडे यांनी दिली. शिवाजी दोलताडे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी आंतरवाली सराटी येथे भेट दिली आणि त्यावेळी ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.