मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी (१३ सप्टेंबर) दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं. सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील संभाषणाचा हा व्हिडीओ होता. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. या व्हिडीओवर आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


















