जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. यावर त्यांच्या मुलीने पल्लवी जरांगे पाटील हीने प्रतिक्रिया दिली आहे. “आता मराठा समाज पेटून उठला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, त्यामुळे सरकारला दखल घ्यावीच लागेल. तसेच ते जर येत असतील तर काही पॉझिटिव्ह निर्णय घेऊन येतील अशी आशा आहे” अशी प्रतिक्रिया पल्लवीने दिली आहे.