PM Modi Live: संसदेच्या विशेष अधिवेशनातून पंतप्रधान मोदी लाईव्ह | Special Session of Parliament 2023
संसदेच्या विशेष पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीमध्ये अधिवेशनातील कामकाजासंदर्भात परिपत्रत जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकानुसार, संसदेच्या विशेष अधिवेशनात एकूण ८ विधेयके चर्चेसाठी येणार आहेत. विशेष म्हणजे, या विधेयकात केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे अधिकार मर्यादित करण्यासंदर्भातील विधेयकाचा समावेश नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.