Women Reservation bill: मोदींनी लोकसभेत मांडलं ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ विधेयक
संसदेचं विशेष अधिवेशन सध्या सुरू आहे. आज (१९ सप्टेंबर) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवन इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांसह प्रवेश केला. यावेळी चर्चेत असलेलं महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडलं.
नव्या संसदेच्या पहिल्या सत्रातील पहिल्या भाषणात मी खूप विश्वास आणि गर्वाने सांगतोय की आजचा हा दिवस खूप खास आहे. आजच्या या दिवशी मी ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेच्या पटलावर मांडत आहे, असं मोदी म्हणाले.