Rahul Gandhi on OBC: “मी एखादी गोष्ट ठरवली, तर…”; राहुल गांधींचा भाजपाला इशारा
पंतप्रधान दररोज ओबीसींबद्दल बोलतात. पण, ओबीसींसाठी काय केलं? असा प्रश्न काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना त्यांनी ओबीसींविषयी भाष्य केलं. देशात पाच टक्के ओबीसी समाज आहे, हे मान्य करायला तयार आहे. पण, पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे हे कळलं पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.