Rohit Pawar: ‘काही लोकांना वाटत असेल आम्ही नेते बनतोय, पण…’; रोहित पवारांचा रोख कुणाकडे?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कल्याणमध्ये असताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. “मला अजितदादांसारखं व्हायचं नाही, मी राजकारणात नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी आलोय” असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आणि चर्चांना एकच उधाण आलं. एमपीएससी पेपर फुटीवर राज्य सरकार कोणतीच कारवाई करत नाही हे आश्चर्चकारक असल्याचंही पवार म्हणाले.