Supriya Sule on Ajit Pawar: संसदेच्या विशेष अधिवेशनातील ते वक्तव्य अन् सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये जवळपास पूर्ण सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर झालं. निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण जनगणना व मतदारसंघ पुनर्रचना झाल्याशिवाय हा लाभ महिला उमेदवारांना घेता येणार नाही. मात्र, या चर्चेदरम्यान अमित शाहांच्या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. हे विधान सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना उद्देशून असल्याचं बोललं जात आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.