Ajit Pawar on Rohit Pawar: रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर अन् अजित पवारांची प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लागले असून यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. मॅजिक फिगर १४५ हा आकडा असतो. तो गाठल्याशिवाय कुणी मुख्यमंत्री होत नाही. केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं. अजित पवार हे आज दिवसभर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते ४० गणपती मंडळाच्या आरती आणि काही उद्घाटने होणार आहेत.