Sanjay Raut on New Parliament: ‘राजाच्या मनात लहर आली आणि एक संसद भवन बनवलं’; राऊतांची मोदींवर टीका
देशाच्या नव्या संसद भवनात काही दिवसांपूर्वीच कामकाज सुरुवात झाली आहे. .यावेळी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. नव्या संसदेत मंजूर झालेलं हे पहिलं विधेयक होतं. मात्र, या नव्या संसद भवनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जुनं संसद भवन मजबूत असताना आणि त्याला काहीच धोका नसताना जुनं संसद भवन उभारण्याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून केला आहे. तसेच पंतप्रधान पद टिकावं म्हणूनच ज्योतिषाच्या सल्लानुसार हे संसद भवन उभारल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे.