Sanjay Raut on Nagpur: ‘अवघ्या ४ तासांचा पाऊस अन् नागपूर वाहून गेलं’; नागपूर पुरावरून राऊतांची टीका
“नागपूरला आलेला पूर आणि प्रलय नैसर्गिक आपत्ती आहेच. नागपुरात हाहाकार सुरु होता, तेव्हा फडणवीस देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणपतीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते. फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका झाली, तेव्हा ते नागपूरकडे रवाना झाले. अवघ्या चार तासांच्या पावसात अख्खे नागपूर वाहून गेले, हाच तुम्ही केलेला विकास आहे का?” असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली