Sanjay Raut on NDA: ‘भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए म्हणजे नौटंकी’; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. देशभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मध्य प्रदेशसाठी भाजपानं उमेदवारांची यादीही जाहीर केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या अनुषंगाने वातवरण तापू लागलं आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आहे. भाजपाला लक्ष्य करताना संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे.