मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित परदेश दौरा पुढे ढकलण्यात आलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करण्याची आयतीच संधी मिळालीय. शिंदेंचा दौरा पुढे ढकलण्यावरून आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यावरच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. “आदित्य ठाकरे यांच्यामुळेच हा दौरा रद्द झाला. मुख्यमंत्री महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते पण महाराष्ट्रातली गुंतवणूक बाजूच्या राज्यात गेली आहे. महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात बुडाला होता तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत? उत्सव साजरे करत होतात?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.