Eknath Shinde: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात मुख्यमंत्र्यांचा सहभाग; जनतेलाही केलं आवाहन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ अभियान रविवारी (१ ऑक्टोबर) राबवलं जात आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या उपक्रमात सहभाग घेतला. तसंच गिरगाव चौपाटीवर जाऊन स्वच्छता मोहीमही राबविली. शिवाय या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.