Indrajit Sawant on Waghnakh: ‘ती’ वाघनखं महाराजांची असतील तर…”; इंद्रजित सावंत यांचं सरकारला आव्हान
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेली वाघनखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. ही ती वाघनखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. मात्र, या वाघनखांवरून आता एक नवा नाद सुरू झाला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित यांनी वाखनखांवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लंडनमधील वाघनखं महाराजांची असतील तर त्याचे पुरावे सरकारने द्यावेत, असं थेट आव्हानही त्यांनी केलं आहे.