मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. चौथ्या मंत्रिमंडळ विस्तारातून अनेक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पदाच्या प्रतिक्षा यादीत असलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.