नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या ३६ तासांत ३१ मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेवरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. हाफकिनकडून औषधे घेण्यासाठी निधी नसल्याने औषधांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.