ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून अमित शाह आणि भाजपावर निशाणा साधलाय. अमित शाह यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, “मणिपूरला काय चाललंय? गृहमंत्री काय सांगतायेत? रक्ताचा एक थेंब न सांडता आम्ही राम मंदिर बांधलं. देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती आहे. मणिपूरमध्ये आज हे रक्तपात सुरू आहे, गृहमंत्री रोखू शकले नाहीत. तुम्ही म्हणता रक्ताचा एक थेंब न काढता राम मंदिर मिळालं. जर तुम्हाला मंदिराचे श्रेय द्यायचे आहे, तर ते सर्वोच्च न्यायालयाला द्या”
















