महाराष्ट्रात सध्या केवळ मराठा आरक्षणाची चर्चा आणि आंदोलन सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा समाजातील तरुण देखील आक्रमक झालेत. आळंदीत श्रीकांत काकडे या तरुणानं चक्क शोलेस्टाईल आंदोलन करत पोलिसांसह नागरिक आणि कुटुंबाची धाकधूक वाढवली होती.



















