राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला कौल मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती महायुतीने जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील या यशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. तसंच मतदारांशी प्रतारणा करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.



















