Sanjay Raut on Kapil Dev: “पडद्यामागे क्रिकेटचं राजकारण सुरू”; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आपल्याला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कपिल यांना आमंत्रित न करण्याचं कारण बोलून दाखवलं आहे.