.Sushma Andhare on Devendra Fadnavis: नवाब मलिक प्रकरण, सुषमा अंधारेंनी फडणवीसांना डिवचलं
जमीन गैरव्यवहार प्रकरणी तरुंगात गेलेले माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत. हिवाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थिती लावल्यानंतर ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत, याची सर्वांनाच उत्सुकता होती. नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे ते अजित पवार गटाच्या बाजूने असल्याचं चित्र स्पष्ट झालं. त्यावरून विधानपरिषदेत चांगलीच खडाजंगी झाली. या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिश्कील टोला लगावला आहे.