“मी पुण्याला जन्माला आलो असतो तर लहानपणापासून बॅडमिंटन खेळलो असतो”, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे जिल्ह्यातील गुणवंत बॅडमिंटनपटू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या बॅडमिंटन प्रेमाविषयी आठवण सांगितली..












