Rohit Pawar In Pune: आमदार रोहित पवार हे आज (५ मार्च) हडपस दौऱ्यावर आहेत. यावेळी काही लोकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी पत्रकारांनी हडपसर विधानसभा निवडणूक येत्या काळात लढविणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर मागील सात महिन्याच्या कालावधीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद देखील मिळालं. त्यानंतर अजित पवार यांनी कर्जत जामखेड येथील भाजपचे नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जवळपास २०० कोटींहून अधिकचा निधी दिला होता. त्यामुळे अजित पवार हे रोहित पवार यांची या माध्यमातून राजकीय कोंडी करीत असल्याचं चित्र दिसून आलं आहे. या सर्व घडामोडी दरम्यान रोहित पवारांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात दौर्याचं प्रमाण वाढवल्याचं दिसत आहे.
MLA Rohit Pawar is on a visit to Hadapsar today (March 5). He met some people this time. At that time, will the journalists contest the Hadapsar assembly election in the future? Asked that question. Rohit Pawar has explained his position on it. After the split in the NCP party, in the last seven months, accusations have been made between the leaders of both sides. Meanwhile, after Ajit Pawar joined the Shinde Fadnavis government, he also got the post of Deputy Chief Minister and Finance Minister. After that, Ajit Pawar had given more than 200 crores to the BJP leader from Karjat Jamkhed, Legislative Council MLA Ram Shinde. Therefore, it has been seen that Ajit Pawar is making a political dilemma for Rohit Pawar through this medium. Amidst all these developments, it seems that Rohit Pawar has increased the number of visits to Hadapsar Assembly Constituency.












