बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा आरोप होत आहे. अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटले, असं म्हणत शरद पवार गटाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच या प्रकरणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील अजित पवार गटावर टीका केली आहे. शिवाय रोहित पवारांनी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.




















