खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (१ जुलै) भाजपाला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून घेरत हल्लबोल चढवला. त्यामुळे लोकसभेत एकच गदारोळ माजला होता. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं बरोबर नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. तर गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींनी माफी मागवी, अशी मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून आज सत्ताधारी पुन्हा राहुल गांधींना घेरण्याची शक्यता आहे.