सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे. अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली. सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगलीच अंगलट आली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते. त्यांच्या बचावकार्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.