आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्याच्या कामांवरून आणि रस्त्यांवरील खड्यांवरुन सरकारवर टीका केली आहे. “नोव्हेंबरनंतर आमचं सरकार सत्तेत येणार असून खोके सरकारची सगळी कंत्राटं आम्ही रद्द करणार आहोत. तसंच मुंबईची लूट करणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकणार आहोत”, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.