Uran Murder Case: मोठी बातमी! दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक, पोलिसांनी कसा रचला सापळा?
Uran Murder Case: उरण येथील यशश्री शिंदेंच्या हत्याप्रकरणी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे. दाऊदला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सगळी कबुली दिल्याची माहिती, नवी मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक सकोर यांनी दिली आहे.