मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचा लाभ घेण्याकरता कोट्यवधींचे अर्ज सरकार दरबारी प्राप्त झाले आहेत. अशातच या योजनेबाबत काही गैरसमजही पसरवले जात आहेत. त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून याबाबत खुलासा केला आहे.