कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यानंतर स्वप्नील आज पुण्यात आला आहे. त्यानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती देखील केली.