यंदा म्हाडाच्या लॉटरीमध्ये तब्बल २०३० युनिट्स म्हणजेच घरं ही उपलब्ध असणार आहेत यामध्ये, दारिद्र्य रेषेखालील, तसेच कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या अर्जदारांसाठी किती घरं असतील, अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, घराच्या किमती काय असतील, अर्ज कुठे व कसा करायचा याविषयीची माहिती सांगणारा हा खास व्हिडीओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या २०२४ मधील मुंबई विभागातील सोडतीचा अर्ज ९ ऑगस्टपासून करता येणार आहे. ८ ऑगस्टला म्हाडाकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर होताच ९ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल.