मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दोऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी थेट उद्धव आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर शरद पवार यांनी पु्ण्यात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कारण नसताना राज ठाकरेंनी आपलं नाव घेतल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी पवारांची भेट घेतली त्यावरही त्यांनी भाष्य केलं