मालवणमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ एक नाव नाही तर आराध्य दैवत आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माफी मागतो, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांचाही विषय काढत राहुल गांधींवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र डागलं.





















