एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने शाळेत जेवणाच्या डब्यात नॉनव्हेज आणल्यामुळे विद्यार्थ्याला थेट शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेत घडला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक मुलावर आणि त्या मुलाच्या पालकावर आरोप करताना दिसत आहेत.(video credit- Mohd Shadab Khan)