नागपूरमध्ये एका भरधाव ऑडीने काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिल्याची घडना रविवारी (८ सप्टेंबर) रोजी घडली. या अपघातामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण ही गाडी आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची. अपघाताचं हे बावनकुळे कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊ या