Ajit Pawar Pune Visit Details: हडपसर विधानसभा मतदार संघातील स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर वैशाली बनकर यांच्या विशेष प्रयत्नांतून पाच नागरिकांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या.त्या रिक्षा चालकांना अजित पवार यांच्या हस्ते रिक्षाचे वाटप करण्यात आले.