जीवन संपवण्यासाठी काही देशांत मदत दिली जाते. होय, हे पूर्णपणे खरं आहे. परंतु, यातही काही अटी आहेत. त्या म्हणजे काही आजारी असणार्या आणि लवकर मृत्यू होणार्या व्यक्ती, अंथरुणाला खिळून असणार्या व्यक्ती आदी व्यक्ती जीवन संपवण्यासाठी म्हणून इच्छामरणासाठी अर्ज करू शकतात. स्वित्झर्लंडमध्ये त्यासाठी सुसाईड पॉडदेखील तयार करण्यात आले आहेत. स्वेच्छेने जीवन संपवणार्यांना स्वित्झर्लंडमध्ये असिस्टेड सुसाईड म्हटले जाते. जेव्हा स्वित्झर्लंडने हे पॉड लॉंच केले, तेव्हा यावरून वादही निर्माण झाला होता. मात्र, आता पुन्हा हे सुसाईड पॉड चर्चेचा विषय ठरत आहेत. यामागील नेमके कारण काय? ‘सुसाईड पॉड’ नक्की काय आहेत? ते कसे कार्य करते? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.