वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचं आज उद्घाट करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. गेले २५ वर्ष कोस्टल रोडबाबत केवळ चर्चा होत होती. देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे. कधीही परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले आणि सगळ्या परवानग्या मिळाल्या, असं फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख केला.