ST Bus Profit: गेली पाच ते सहा वर्ष आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येवू लागले आहेत. एसटी महामंडळाच्या ३१ पैकी २० विभागांनी ऑगस्ट महिन्यात नफा कमवला आहे. एसटी महामंडळाला ऑगस्टमध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. तब्बल ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळाला सातत्याने फायदा होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.