Loksatta Lok Samvad: जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. काश्मीरमध्ये काय होणार, तेथील राजकीय सद्य:स्थिती, निवडणूक निकालानंतर काय स्थित्यंतरे होऊ शकतात, याकडे देशाचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा-पीडीपी युतीचे शिल्पकार, जम्मू आणि काश्मीरचे माजी अर्थमंत्री, जम्मू काश्मीर बँकेचे अध्यक्षपद आणि नियोजन आयोगाचे सल्लागारपद भूषविलेले हसीब द्राबू यांच्याबरोबरचा हा ‘लोकसत्ता लोकसंवाद’.