Nitin Gadkari Toll Collection: टोल वसुली व रस्त्यांचा दर्जा यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नेहमीच जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. टोल वसुलीवरून एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोमवारी नितीन गडकरी यांनी रोखठोक भूमिका मांडली. नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की रस्ता बांधण्यात १,९०० कोटी रुपयांचा खर्च झाल्यास त्याच रस्त्यावरून चालवल्या जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनधारकांकडून ८,००० कोटी रुपयांचा टोल का वसूल केला गेला? यावर नितीन गडकरी म्हणाले, “टोल वसुली ही काय एका दिवसात केली जात नाही. तसेच रस्त्यांवर इतरही अनेक प्रकारचे खर्च होतात”. यावेळी गडकरी यांनी एक उदाहरण देखील दिलं.