प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी (९ ऑक्टोबर) मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ याने देखील आपल्या लाईव्ह काॅन्सर्टदरम्यान रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली. दिलजीतचं जर्मनी येथे लाईव्ह काॅन्सर्ट सुरू होतं. त्यावेळी रतन टाटा यांच्या निधनाची माहिती मिळताच दिलजीतने लाईव्ह काॅन्सर्ट थांबवत टाटांना
श्रद्धांजली वाहिली.