पुण्यातील राष्ट्रीय एकात्मता समितीच्यावतीने लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ व राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे तीन दिवसांपासून भिडेवाडा येथील समता भूमीच्या ठिकाणी आत्मकलेश उपोषणास बसले आहेत. मतदानातील टक्केवारीवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी अदाणी प्रकरणावरूनही पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं.