ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ते तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा आढाव
यांची भेट घेतली.