Ajit Pawar slams MVA Opposition: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे ४९ आमदार आज शपथ घेणार नाहीत, अशी बातमी विविध वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे. ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला विरोध दर्शवत विरोधी पक्षांचे आमदार आज आमदारकीची शपथ घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. यावरून राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे, महाविकासाआघाडीचा हा प्रयत्न म्हणजे केविलवाणा असल्याचे सुद्धा अजित पवार म्हणाले आहेत.