Ajit Pawar Assets Cleared : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यानंतर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही तासांतच राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.