Chandrashekhar Bawankule: शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या? हा प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी त्यासाठी एक गणितच मांडलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाचं गणित मांडूनच शरद पवारांना उत्तर दिलं. आता आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली आहे. जनतेला कन्फ्युज करण्याचं आणि आपलं अपयश लपवण्याचं काम शरद पवार करत आहेत, असं बावनकुळे म्हणाले.